आपल्याच आपल्या स्वार्थी परिघात ती मोजकीच 'आपली' माणसं असतात, ज्यांच्या सुखदुःखात आपला 'स्वार्थ' असतो - समाधानाचा. ज्यांच्या आणि आपल्या मध्ये 'अंतर' असतं स्नेहाने भरलेलं, जेवढं 'अंतर' जास्त, तेवढा स्नेह जास्त. आपली माणसं सतत आपल्या आसपास असतात, तेव्हा अनेकदा ती कंटाळवाणी वाटतात, कारण मानवी मनालाच काय, निसर्गाला सुद्धा 'बदल' हवा असतो. हे स्वाभाविक आहे. एखाद्या गोष्टींचं महत्व किंवा गरज समजावून घ्यायला काही दिवस तिला अलिप्त ठेवावं लागतं. मग उमजतं त्या गोष्टींचं मूल्य. ते कायम जास्तच असावं हा हट्ट मुर्खपणाचा. ते कमी सुद्धा का नसायला हवं ? वरती उल्लेख केला तसं आपल्या परिघात नकळत 'आपल्या' बनून गेलेल्या व्यक्ती या आपल्या बाजूने 'आपल्या बनलेल्या' आहेत ! समोरून तशीच परिस्थिती असेल असं गृहीत धरू नये कारण - 'व्यक्तिस्वातंत्र्य' आपल्या परिघातली माणसं निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो आणि त्याचा आदर करणं आपल्याला भाग पडतं. इथे 'अपेक्षा ठेवू नका' वगैरे हळवेपणा आणण्याची गरज नाही. जे आहे ते सुरळीत चालू असतं, तुमच्यासाठी स...
यापूर्वीचा भाग - १ इथे वाचा आता गाडी बेलवंडी फाट्याच्या पुढं निघाली. पुणे नगर हायवेनी. चाकं पाण्याने काळी चकाचक झालेली. चर्रर्रर्र आवाज करत पाणी उडवत होती. तसंही गाडीचा वर्षभराचा इटाळ पावसाने भिजल्याशिवाय निघत नाही. हे म्हणजे गाडीचं अभ्यंगस्नान. हायवे असला तरी आपल्या डाव्या साईडला इथून तिथून पाणी साचलेलं. ते पाणी जास्त असेल तर तंगड्या वर करणे. गाडीच्या उजेडात पुढं फूटभरच दिसत होतं. पावसाची सर कंटूनी चालूच. सोबत हवेचे झपके येत होते. वाडेगव्हाण गेलं, गोळीबार फाटा गेला. पुढं चिंभळ्याचा डोंगर सोडा, मागून आलेली गाडी रापक्यास पाणी उडवल्याशिवाय दिसत नव्हती. गाडी घाटाला लागली. तवर आमची बॉडी पूर्ण भिजलेली नव्हती. बॉडी भिजणं महत्वाचं नसतंय पावसात. अंडरप्यांटीत पाणी शिरणं सफिशियंट असतं. तोपर्यंत कसला बी अंटू फंटू पावसात भिजतो. एकदा का अंडरप्यांटीत पाणी शिरलं, की विषय खल्लास. तुम्ही इंस्टाला फोटोमागं कितिबी KGF चं रॉकिंग टाईप music टाकत असाल, पण पावसात आतमध्ये पाणी शिरल्यावर तिथून पुढं तुमची खरी मंजिल, ध्येय, चिकाटी, लाथ मारीन तिथं पाणी काढीन वगैरे सगळा खेळ सुरू हो...