बेंचवर बसल्या बसल्या झोपणारा माणूस मी..एखादे दिवस असंच होतं राव !
ऑफिसवरून यायला उशीर झाला, खाता-पिता, whp चा पसारा आवरता आवरता उशीर झाला !
हात्तीच्या ! मध्यरात्रीचे २ वाजले 🤔
पुस्तक वाचता वाचता झोपू..
२ वाजून तीस मिनिटं ?
आता झोपलंच पाहिजे ब्वा !
Light बंद, झोपलो.
म्हटलं झंडू बाम लावू म्हणजे सर्दी नाही होणार, उठलो, बाम लावलं
थोडा वेळ डोळे मिटून..
आज उशी थोडी मोठी वाटतेय, काढून ठेवावी का ?
नको झोपच आता ..
सकाळपर्यंत मान अवघडली तर ? काढूनच ठेऊ उशी, काढली
मग झोपलो
आत्मचिंतन करू दिवसभराचं, म्हणजे झोप लागणार
जर्किन ची गरज नाही आज, थंडी नाहीच मुळात..
पहाटे थंडी पडेल, राहू देऊ
झोप नाही लागत, जर्किन मुळेच !
उठलो, ठेवलं काढून
झोपलो, झोप लागली
कुत्र्याचं बारीक पिल्लू, दारासमोर येऊन भुंकायला लागलं, थांबेचना. जाऊदे, थंडी वाजली असेल त्याला, थांबेल
(काही दिवसांपूर्वी आपणच त्याला थंडीपासून वाचवत रूममध्ये झोपवलेलं, त्यानं सकाळी दोन कोपऱ्यात दोन प्रकारे विसर्जन केलेलं ! परत असला लाड नाही भो)
का भुंकत असेल 🤔
अशी झोप येणार नाही, उठलो
बाहेर जाऊन हाकलून दिलं, डाव्या बाजूने जिन्याखाली जाईपर्यंत.
झोपलो
ते परत आलं, दारासमोर येऊन भुंकत बसलं..
या वेळी गुपचूप दरवाजा उघडला.
समोर औषधाची बाटली होती. मोकळी, उचलली त्याच्या मागे दोन पावलं पळालो, आता उजवीकडे
त्याला आता खाली जायला वाट राहिली नाही
विव्हळलं
वाईट वाटलं, मग खाली जाऊ दिलं
निम्म्या जिन्यात जाऊन परत भुंकायला सुरू
मग हातातली बाटली फेकून मारली, नाही लागली
पण ते खाली गेलं, परत आवाज नाही आला
मग झोपलो
परत नाही भुंकलं
दुसऱ्या दिवशी लवकर झोपून घेतलं.
- तुषार
Comments
Post a Comment