आई तु जरा शांत बसशील का ?
मला माझं काम करू दे
माझे निर्णय मला घेता येतात
आता मी मोठा झालोय...
आई पाहुणे आल्यावर जरा नीटनेटकं राहत जा
माझे उच्चपदस्थ मित्र काय म्हणतील ?
त्यामुळे तू जरा हळू बोलत जा
आता मी मोठा झालोय...
तुला काही सांगावंच कि नाही गं आई ?
माझ्याबद्दल काहीही सगळ्यांनाच सांगत सुटतेस
जरा तोंडावर ताबा ठेवत जा आता
आता मी मोठा झालोय...
आता ते कपडेलत्ते जरा कमी भर
आणि तो डब्बा जरा स्वच्छ धुऊन दे की
माझ्या गरजा मला कळतात आता
आता मी मोठा झालोय...
आई तो ऑफिसचा पांढरा शर्ट धुऊ नकोस
मी आणतो ड्रायक्लीन करून
उगीच तुझ्या हाताचा डाग लागायचा
आता मी मोठा झालोय ना ...
रोजरोज फोन करायला माझ्याकडे वेळ नाहीय
रोज खुशाली कळवायला मी काय लहान नाहीय
निघतोय आता, तुझ्या काळजीचा पुळका बंद कर
आता मी मोठा झालोय...
- ..तुषार..
Comments
Post a Comment