* स्वयंसेवक (२४/०९/२०१७) सामर्थ्यशाली विचारांचं भव्य भांडार आणि त्या विचारांना दिलेली कृतीची जोड यांचा संयुगरित्या मेळ घालण्याची धमक युवक बुद्धीमधे असते. अश्याच काहीशा विचारधारेतून उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत २४ सप्टेंबर १९६९ रोजी राष्ट्राने पाहिलेल्या स्वप्नाला साकारण्यासाठी महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षाचा मुहूर्त साधून एका विशाल योजनेला तरूणांच्या झगझगत्या मशाल देत शुभारंभ झाला. पावसाचा एक एक थेंब आणि या थेंबातून तळे, तळ्यातून झरा आणि या झर्याची नदीला समुद्रास रूपांतर करण्यास मिळालेली उमेद, याच उमेदीने आज राष्ट्रीय सेवा योजनेच्या लाखो ,हजारो तरूण तरूणींच्या खांद्यावर ताठ मानेने उभी आहे. वैयक्तिक आयुष्य जगताना समाजात असलेले आपले अस्तित्व समाजाच्या विचारांशी जोडलेली नाळ, त्यांच्या समस्या समजावून घेत , समाजाला योग्य मार्गाने नेण्याचा यशस्वी प्रयत्न रा.से.यो. चे स्वयंसेवक आजही पार पाडताहेत. तालमीतील मातीत कणखर परिश्रम आणि डावपेच टाकण्यात पटाईत घडलेला पहिलवान जसा समोरून येणार्या प्रत्येक डावाला चितप...
"अगणित शब्दांच्या विश्वात तरळताना विचारांचा एक सात्विक थर तयार व्हावा, जो घेऊन जातो मनाला एका विचारश्रेणीवर, तरळत राहावा हा थर मनात आणि मज्जारज्जूतून थेट मस्तकात जात मेंदूकडून उतरावा अवयवांच्या तेजस्वी रूधिरामध्ये, जो घडवील एक क्रांतीकारी कार्य जे या कलमातून शब्दातआणि शब्दातून विचारसंकल्पात दृढपणे रूतून बसेल..."