(२४/०९/२०१७)
सामर्थ्यशाली विचारांचं भव्य भांडार आणि त्या विचारांना दिलेली कृतीची जोड यांचा संयुगरित्या मेळ घालण्याची धमक युवक बुद्धीमधे असते. अश्याच काहीशा विचारधारेतून उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत २४ सप्टेंबर १९६९ रोजी राष्ट्राने पाहिलेल्या स्वप्नाला साकारण्यासाठी महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षाचा मुहूर्त साधून एका विशाल योजनेला तरूणांच्या झगझगत्या मशाल देत शुभारंभ झाला.
पावसाचा एक एक थेंब आणि या थेंबातून तळे, तळ्यातून झरा आणि या झर्याची नदीला समुद्रास रूपांतर करण्यास मिळालेली उमेद, याच उमेदीने आज राष्ट्रीय सेवा योजनेच्या लाखो ,हजारो तरूण तरूणींच्या खांद्यावर ताठ मानेने उभी आहे. वैयक्तिक आयुष्य जगताना समाजात असलेले आपले अस्तित्व समाजाच्या विचारांशी जोडलेली नाळ, त्यांच्या समस्या समजावून घेत , समाजाला योग्य मार्गाने नेण्याचा यशस्वी प्रयत्न रा.से.यो. चे स्वयंसेवक आजही पार पाडताहेत. तालमीतील मातीत कणखर परिश्रम आणि डावपेच टाकण्यात पटाईत घडलेला पहिलवान जसा समोरून येणार्या प्रत्येक डावाला चितपट करण्याची क्षमता ठेवतो ,अगदी असंच रा.से.यो. मधे घडलेला प्रत्येक हिरा भावी नागरिकत्व , पालकत्व असो किंवा नेतृत्व असो, त्यांना कुठल्याही वादळाची तमा नसते. या स्वयंसेवकांना मर्यागा असते ती फक्त आभाळाचीच. आयुष्यभराची शिदोरी दोन वर्षात घेता घेता या स्वयंसेवकांच्या दोन पिढ्यांना पुरतील असे संस्कार आणि जाणीवा अनुभवायला आणि शिकायला मिळतात. आणि मग धरणातून प्रचंड इच्छाशक्तीने वाहिलेला पाण्याचा लोट ज्याप्रमाणे वाट सापडेल त्या दिशेने आपला मार्ग कापत जातो तो त्याच्या ध्येयाकडे अगदी तसाच नितळ आणि अविरत इच्छाशक्तीने रा.से.यो. चा युवक समाजात वावरत असतो.
*_हम उठें,उठेगा जग हमारे संग साथियो,_*
असं आवाहन करणार्या रा.से.यो.चा स्वयंसेवक जगण्यासाठी आणि लढण्यासाठी या स्वबळ आणि प्रबळ भारताचं स्वप्नं उरी घेउन हरएक प्रतिकूल परिस्थितीतही सज्ज असतो.
४८ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या नवयूग मोहिमेत दरवर्षी लाखो युवक युवती स्वत:मधे नेतृत्वगुण , वक्तृत्वगुण, आणि समाजाचं काही तरी देणं असल्याची जाणीव दोन वर्षात प्राप्त करून आयुष्यभर कर्तृत्व गाजवतात. _धूळ खात पडलेल्या काळ्याकूट्ट दगडाची सुरेख सुंदर मुर्ती कशी बनू शकते याची कैक उदाहरणं मी रा.से.यो.च्या दोन वर्षात स्वत: अनुभवलीत._ स्वत:मधे असलेली प्रचंड ताकद, सामर्थ्य ओळखायला शिकवलं ते रा.से.योजनेनेच. आई- बाबांनंतर आयुष्य जगण्याचं प्रशिक्षण कुठं मिळत असेल तर ते रा.से.यो. च्या माध्यमातूनच मिळेल हे मी प्रत्येक युवक मित्राला सांगायला विसरणार नाही. अनेकवेळा तर मी एका प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता थकून जातो की मला रा. से.यो. मधे मला काय मिळालं नाही ?? एखादा स्वयंसेवक रा.से.यो. म्हणजे काय हे शब्दात सांगू शकत नाही, त्यासाठी स्वत: स्वयंसेवक होऊन अनूभवावं लागेल,तरच समजू शकतं रा. से.यो. काय आहे ते. आजच्या घडीला स्वयंसेवी संस्थांमार्फत जे काम राष्ट्रात होत नसेल, ते काम संघटीतपणे करण्याची धमक रा.से.यो. च्या स्वयंसेवकांमधे आहे आणि हे कित्येकवेळा हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवूनही दिलंय. दरवर्षी प्रत्येक क्षेत्रामधे प्रचंड प्रमाणात यशस्वी कार्ये रा.से.यो.कडून घडताहेत. मग ते साहित्यापासून ते कलाकारीतेपर्यंत, जनतेच्या प्रबोधनापासून ते जीवित संरक्षणापर्यंत, राष्ट्राच्या ग्रामिण समस्यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तराच्या समस्यांपर्यंतचे कार्य आजतागायत रा.से.यो. कडून घडतंय.
शिरूरच्या *चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय*ात शिकताना _सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या_ रा.से.यो. चा स्वयंसेवक आणि प्रतिनीधी म्हणून काम करताना मिळालेले अनूभव माझ्या प्रत्येक क्षणाच्या जगण्याचं प्रतिबिंब आहे. याच काळात विद्यापीठाचे माजी कुलगूरू मा.डॉ.श्री.वासूदेव गाडे सर, रा.से.यो. चे संचालक प्रा.डॉ.संजयकुमार दळवी सर, सध्याचे कुलगूरू मा.श्री.डॉ.नितीन करमळकर सर आणि रा.से.यो.चे संचालक प्रा.डॉ. प्रभाकर देसाई सर या हस्तींचं मार्गदर्शन आणि विचार लाभले.
सी.टी.बोरातील कार्यक्रम अधिकारी असतील तसेच रा.से.यो.च्याच टाक्याने घडलेल्या काही प्रेरणादायी मूर्त्या , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त औरंगाबाद विद्यापीठाचे भावलेले व्यक्तिमत्व मा.डॉ.राजेश करपे सर, इंदापूर कॉलेजचे राष्टीय इंदिरा गांधी पुरस्कार सन्मानीत प्राचार्य डॉ.संजय चाकणे सर , नुकतंच राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कृत संगमनेर कॉलेजचे डॉ.फलफले सर, डॉ.भगवान माळी सर( टी.सी कॉलेज,बारामती) अशा आणि इतर अनेक व्यक्तिमत्वांच्या सहवासाने, आणि प्रेरणेने एक वेगळा दृष्टिकोण प्राप्त झाला. *राज्यभरात रा.से.यो. च्या ज्योतीने प्रज्वलित आपापल्या क्षेत्रात यशस्वी काम करणारे जीवाभावाचे स्वयंसेवक मित्रसहकारी भांडार* फक्त रा.से.यो. मुळेच मिळू शकले.
आयुष्यभर रा.से.यो.चा स्वयंसेवक म्हणून राष्ट्रसेवा करताना नक्की अभिमान वाटेल. देशाच्या प्रत्येक नवतरूणाला हक्काने सांगावंसं वाटतं,
*_उठ तरूणा जागा हो ,NSS चा धागा हो !!_*
या राष्ट्रानेही आपली उज्वल भवितव्याची धुरा रा.से.यो. च्या स्वयंसेवकांच्या मजबूत आणि एकसंध खांद्यावर निश्चिंतपणे द्यायला हरकत नाही.
*_उठें समाज के लिये उठें, उठें.._*
_जगें स्वराष्ट्र के लिये जगें जगें.._
*स्वयं सजें वसुंधरा सवॉंर दे |*
-- तुषार पोपटराव वाघमारे , देवदैठण.
mast re bhau
ReplyDeleteधन्यवाद काशीनाथ.. खूप खूप आभार
DeleteBhau lay bhari
ReplyDeleteधन्यवाद .. खूप खूप आभार !!
DeleteBhawa lay bhari
ReplyDeleteधन्यवाद .. खूप खूप आभार !!
Deleteखूप भारी आहे.👌
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !
DeleteKhup chan ahe bhau
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद भाऊ 😊
DeleteMla abhiman vatato bhava tuja
ReplyDeleteKupach chaan
Mla hi avdel sahbhagi hoyla
मनःपूर्वक धन्यवाद संकेत 😊
Deleteतुषार तो पंढरपूर कॉलेजमधला फोटो मी काढलाय.
ReplyDeleteमयुर गार्डी
होय ! धन्यवाद मयूर. हा फोटो फक्त इथेच राहिलाय, माझ्याकडे save नाहीय.
Delete