Skip to main content

Posts

विज्ञानाच्या मर्यादा

      विज्ञान म्हणजे कुतूहलच ! नवनवीन शोध लागले, तसं कुतूहलही वाढलं. आता हे कुतूहल, कुतूहल राहायला नको. विज्ञान जरी अमर्याद असलं, तरी नैसर्गिक मर्यादा ओळखून आणि ठरवूनच संशोधनाचे मापदंड ठरावेत.  फोटो - सनी धारक       अज्ञात, कल्पनेच्या पलीकडचं शोधता येतं हे पहिले पाऊल, आता दुसरं पाऊल 'काय हिताचं शोधायचं ?' याचा विचार करूनच असायला हवं. पक्वान्नाच्या ताटात विरुद्ध गुणधर्म असणारे पदार्थ देखील असतात. ते स्वादिष्ट आहेत म्हणून सगळे एकदम खाल्ल्याने अजीर्ण होतं, पोट बिघडतं !  - तुषार

नाती जपताना - २

   काही गीतं आणि व्यक्ती यांच्यातला सूर सापडल्यासारखं वाटतं, ते गीत रोज कानावर पडेल, ती व्यक्ती रोज आसपास असेल, इतपत ते आपलेसे वाटतात, ती व्यक्ती सवयीची बनते, अगदी ते बेसूर असले तरीही !       तिच्या चुका, तिच्या चांगल्या-वाईट सवयी, तिचे व्यंग, तिचे आजारपण, आपली सवय होऊन जातात. आपल्या ठिकाणी त्या व्यक्तीबद्दलच्या तक्रारींना जागा उरत नाही किंवा त्या गृहीत धरल्या जातात. मग ती व्यक्ती मित्र असेल, मैत्रीण असेल, आई, बाप, बहीण, प्रियकर, प्रेयसी किंवा कुठल्याच नात्याचं लेबल नसलेलं अनामिक नातं ! - तुषार

नाती जपताना - १

      भावनिक (Emotional) आणि कठोरतेच्या Saturation Point लाच कुणी एखादी व्यक्ती, तिच्या भोवतालची माणसं, त्यांचा पजेसिव्ह पणा, काही खाजगी गोष्टी (secrets) सांभाळण्यात यशस्वी होत असावी, इमोशनल किंवा कठोर या दोन्हीही टोकाच्या व्यक्तींकडून फसगत होते.        एखाद्या गोष्टीला, मुद्द्याला, अति ओढाताण न करता 'It's Okay' म्हणता यायला हवं. त्यांना कवटाळून बसल्याने त्या अधिक किचकट आणि गुंतागुंतीच्या होत जातात. अगदी या फुलपाखराच्या तुटलेल्या पंखासारखं, तुटलेलं असलं तरी अलगद, सहज हाताळलं तरच बाकी राहिलेलं टिकणार आहे, त्याचा रंगही आणि सौंदर्यही ! - तुषार 

भयकथा १ - अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई...

अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई सत्य घटनेवर आधारित.. सायकलच्या पॅडलची करकर, मध्येच अंधारात न दिसलेल्या खड्ड्यात सायकल जाऊन वाजणारी घंटी आणि दोघांचीही चूप !  ना रस्त्याकडेला एखादं घर, ना शेतातली दिवाबत्ती, फक्त अंधार आणि अंधारच. अधुनमधुन एखादा माणूस गेल्यावर नातेवाईक जसा आक्रोश करतात तसा अक्राळविक्राळ आवाज काढणारे कोल्हे अंगावर शिरशिरी उठवत होते.           शिंदे (म्हणजे मी स्वतः), बंट्या तांबे (पोंचू) आणि माऊल्या दंडवते (कावळा). तिघांची गट्टी लंय झ्याक. गावात शाळेसमोरच आमचं जुनं घर उभ्या फळ्यांचं बनवलेलं. वर्गातून रस्त्यालगतची ती रूम खिडकीतून दिसेल अशी. इयत्ता १० वी चं वर्ष होतं, त्यामुळे STD मधून TD ने सायकल दामटत लवकर घरी जायचं, दिवस मावळायच्या आत घरचं असेल ते काम उरकून रूमवर हजर व्हायचं. हे नेमानं ठरलेलं. निमित्त अभ्यास असलं तरी, पोरं सोरं एकत्र आल्यावर खंडीभर उद्योग सुचतात.    असो त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत दुपारच्या सुट्टीत बेंच वर बुक्क्यांनी वाजवत चांगला ताल धरला होता. पोरींची रांग शेजारीच असल्याने सोज्वळ...

तिची वाट पाहता पाहता - भाग २

यंदा महामंडळाच्या लाल परीचा ७१ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त एसटी सोबतच्या कडूगोड आठवणींना उजाळा देण्याचं ठरलं.. सादर आहे याचा भाग २  भाग २ पूर्वी भाग १ चा शेवटचा थोडा भाग प्रस्तुत करत आहे ....या सगळ्यात खूप मानसिक चिडचिड होई, पण करता काय ! पर्याय नव्हता, आहे तीच परिस्थिती सर्वोत्तम पर्याय आमच्यासाठी होता. एवढा वेळ स्टँड वरती उपाशी पोटी माश्या मारत फिरल्यावर ६:३०-७ वाजता घरी जाण्यासाठी ३ बसेस त्या विसापूर, हंगेवाडी आणि म्हसे. त्यामुळे घरी लेट ८ पण पर्यंत पण थेट पोहोचत असू.  तिची वाट पाहता पाहता - भाग २     आता कशीबशी श्रीगोंदा गाडी भेटलीच नशिबाने तर काय तेही सुखाचं नव्हतं. कंडक्टर ची मनमानी सहन करत प्रवास करायचा. लेडीज कंडक्टर नव्यानेच या मार्गी आली असेल तर तिला काय करू तेच सुचत नसे, ती रडकुंडीला येई. अनेकदा एका चष्मावाल्या कंडक्टर मुलीने तिकिटं काढायची उरकली नाहीत म्हणून पुणे नगर हायवे सोडताना लागणाऱ्या बेलवंडी फाट्यावरच सिंगल बेल देत १५-२० मिनिटं प्रवाशांना उकडत ठेवलेलं आठवतं. त्यांना आव्हान द्यायला अजून भरात भर 'बेलवंडी फाट्यावरचं कोण कोण आ...

तिची वाट पाहता पाहता - भाग १

यंदा महामंडळाच्या लाल परीचा ७१ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त एसटी सोबतच्या कडूगोड आठवणींना उजाळा देण्याचं ठरलं.. त्यातील पहिला भाग तुमच्यासाठी.. तिची वाट पाहता पाहता - भाग १           प्रथम एसटी ची गाठ पडली मी अगदी लहान असताना मामाच्या गावाला आईसोबत जायचो तेव्हा. तेव्हापासून ते २०१७ पर्यंत म्हणजे मी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असेपर्यंत लालपरीशी खूप जवळचं नातं एकदम फेविकॉल च्या जोडासारखं राहीलं. अजूनही आहे, पण असं मोटारसायकल सारखी नवीन गर्लफ्रेंड मिळाल्यावर लालपरी सोबत ब्रेकअप झाल्यासारखंच !! एसटी प्रवासातील गूढं-गुपितं आम्हालाच माहिती      आज OLA, UBER आणि मेट्रो च्या जमान्यात सुद्धा अनेक डोंगरवस्त्यांपर्यंत अगदी कच्च्या रस्त्याने दळणवळण आणि रोजनिशी संपर्काचं साधन म्हणजे एस टी ! खेडोपाड्यात राहणाऱ्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक किंवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी जवळच्या शहरात जावं लागतं. त्यांना जाण्यायेण्याचं एकमेव साधन एसटी हे होतं, आणि आताही बऱ्याच प्रमाणात आहे. आईसोबत मामाच्या गावाला निघ...

प्रासंगिक - ५ एक प्रेरणादायी आत्मचरित्र- एक खोड तीन फांद्या

एक प्रेरणादायी आत्मचरित्र - एक खोड तीन फांद्या          अहमदनगर मध्ये एका वृत्तवाहिनीसाठी काम करत असताना एका पुस्तक प्रकाशनाला जाण्याचा योग आला. ते वाचनात आलेलं पुस्तक माझ्या दृष्टीने कसं वाटलं हे मांडण्याचा प्रांजळ प्रयत्न..        ‘एक खोड तीन फांद्या’ हे गुगळे परिवारातल्या श्रीमती सदाबाई हरकचंद गुगळे यांचं हे आत्मचरित्र , परंतु संपूर्ण गुगळे परिवाराचं आहे कि काय असा भास होतो . आत्तापर्यंत गुगळे परिवाराला सुखी कुटुंबाच्या रुपात अदबशीर एकत्र जोडून ठेवण्याचं काम या बाईंनी केलं, म्हणून ‘एक खोड तीन फांद्या’ हे शीर्षक समर्पक ठरतं.  सध्याच्या मोबाइल फोन आणि सोशल मीडियाच्या जमान्यात सगळे व्यस्त असल्याने एकमेकांशी संवाद होतो तो मोबाईल वरूनच, काही माहिती, ज्ञान हवं असेल तेही गूगल आणि Youtube च्या माध्यमातून. मग अशात म्हाताऱ्या माणसाच्या बडबडीकडे कोण डोंबल्याचं लक्ष देतंय ! खरं तर खरा अनुभवाचा आणि ज्ञानाचा साठा म्हातारी माणसं आहेत, हे गुगळे परिवाराने या पुस्तकातून दाखवुन दिलं. श्रीमती गुगळेंच्या व्यक्ती म्हणून आतल्या वेगळेपण...