काही गीतं आणि व्यक्ती यांच्यातला सूर सापडल्यासारखं वाटतं, ते गीत रोज कानावर पडेल, ती व्यक्ती रोज आसपास असेल, इतपत ते आपलेसे वाटतात, ती व्यक्ती सवयीची बनते, अगदी ते बेसूर असले तरीही !
तिच्या चुका, तिच्या चांगल्या-वाईट सवयी, तिचे व्यंग, तिचे आजारपण, आपली सवय होऊन जातात. आपल्या ठिकाणी त्या व्यक्तीबद्दलच्या तक्रारींना जागा उरत नाही किंवा त्या गृहीत धरल्या जातात. मग ती व्यक्ती मित्र असेल, मैत्रीण असेल, आई, बाप, बहीण, प्रियकर, प्रेयसी किंवा कुठल्याच नात्याचं लेबल नसलेलं अनामिक नातं !
- तुषार
- तुषार
Comments
Post a Comment