Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020

सरकारी कामासारखी लांबलेली झोप 😴

                   बेंचवर बसल्या बसल्या झोपणारा माणूस मी.. एखादे दिवस असंच होतं राव !                               ऑफिसवरून यायला उशीर झाला, खाता-पिता, whp चा पसारा आवरता आवरता उशीर झाला ! हात्तीच्या ! मध्यरात्रीचे २ वाजले 🤔 पुस्तक वाचता वाचता झोपू.. २ वाजून तीस मिनिटं ? आता झोपलंच पाहिजे ब्वा !  Light बंद, झोपलो.  म्हटलं झंडू बाम लावू म्हणजे सर्दी नाही होणार, उठलो, बाम लावलं  थोडा वेळ डोळे मिटून.. आज उशी थोडी मोठी वाटतेय, काढून ठेवावी का ? नको झोपच आता .. सकाळपर्यंत मान अवघडली तर ? काढूनच ठेऊ उशी, काढली मग झोपलो आत्मचिंतन करू दिवसभराचं, म्हणजे झोप लागणार  जर्किन ची गरज नाही आज, थंडी नाहीच मुळात..   पहाटे थंडी पडेल, राहू देऊ झोप नाही लागत, जर्किन मुळेच ! उठलो, ठेवलं काढून  झोपलो, झोप लागली  कुत्र्याचं बारीक पिल्लू, दारासमोर येऊन भु...

विज्ञानाच्या मर्यादा

      विज्ञान म्हणजे कुतूहलच ! नवनवीन शोध लागले, तसं कुतूहलही वाढलं. आता हे कुतूहल, कुतूहल राहायला नको. विज्ञान जरी अमर्याद असलं, तरी नैसर्गिक मर्यादा ओळखून आणि ठरवूनच संशोधनाचे मापदंड ठरावेत.  फोटो - सनी धारक       अज्ञात, कल्पनेच्या पलीकडचं शोधता येतं हे पहिले पाऊल, आता दुसरं पाऊल 'काय हिताचं शोधायचं ?' याचा विचार करूनच असायला हवं. पक्वान्नाच्या ताटात विरुद्ध गुणधर्म असणारे पदार्थ देखील असतात. ते स्वादिष्ट आहेत म्हणून सगळे एकदम खाल्ल्याने अजीर्ण होतं, पोट बिघडतं !  - तुषार

नाती जपताना - २

   काही गीतं आणि व्यक्ती यांच्यातला सूर सापडल्यासारखं वाटतं, ते गीत रोज कानावर पडेल, ती व्यक्ती रोज आसपास असेल, इतपत ते आपलेसे वाटतात, ती व्यक्ती सवयीची बनते, अगदी ते बेसूर असले तरीही !       तिच्या चुका, तिच्या चांगल्या-वाईट सवयी, तिचे व्यंग, तिचे आजारपण, आपली सवय होऊन जातात. आपल्या ठिकाणी त्या व्यक्तीबद्दलच्या तक्रारींना जागा उरत नाही किंवा त्या गृहीत धरल्या जातात. मग ती व्यक्ती मित्र असेल, मैत्रीण असेल, आई, बाप, बहीण, प्रियकर, प्रेयसी किंवा कुठल्याच नात्याचं लेबल नसलेलं अनामिक नातं ! - तुषार

नाती जपताना - १

      भावनिक (Emotional) आणि कठोरतेच्या Saturation Point लाच कुणी एखादी व्यक्ती, तिच्या भोवतालची माणसं, त्यांचा पजेसिव्ह पणा, काही खाजगी गोष्टी (secrets) सांभाळण्यात यशस्वी होत असावी, इमोशनल किंवा कठोर या दोन्हीही टोकाच्या व्यक्तींकडून फसगत होते.        एखाद्या गोष्टीला, मुद्द्याला, अति ओढाताण न करता 'It's Okay' म्हणता यायला हवं. त्यांना कवटाळून बसल्याने त्या अधिक किचकट आणि गुंतागुंतीच्या होत जातात. अगदी या फुलपाखराच्या तुटलेल्या पंखासारखं, तुटलेलं असलं तरी अलगद, सहज हाताळलं तरच बाकी राहिलेलं टिकणार आहे, त्याचा रंगही आणि सौंदर्यही ! - तुषार