Skip to main content

तिची वाट पाहता पाहता - भाग २

यंदा महामंडळाच्या लाल परीचा ७१ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त एसटी सोबतच्या कडूगोड आठवणींना उजाळा देण्याचं ठरलं.. सादर आहे याचा भाग २ 

भाग २ पूर्वी भाग १ चा शेवटचा थोडा भाग प्रस्तुत करत आहे

....या सगळ्यात खूप मानसिक चिडचिड होई, पण करता काय ! पर्याय नव्हता, आहे तीच परिस्थिती सर्वोत्तम पर्याय आमच्यासाठी होता. एवढा वेळ स्टँड वरती उपाशी पोटी माश्या मारत फिरल्यावर ६:३०-७ वाजता घरी जाण्यासाठी ३ बसेस त्या विसापूर, हंगेवाडी आणि म्हसे. त्यामुळे घरी लेट ८ पण पर्यंत पण थेट पोहोचत असू. 

तिची वाट पाहता पाहता - भाग २




    आता कशीबशी श्रीगोंदा गाडी भेटलीच नशिबाने तर काय तेही सुखाचं नव्हतं. कंडक्टर ची मनमानी सहन करत प्रवास करायचा. लेडीज कंडक्टर नव्यानेच या मार्गी आली असेल तर तिला काय करू तेच सुचत नसे, ती रडकुंडीला येई. अनेकदा एका चष्मावाल्या कंडक्टर मुलीने तिकिटं काढायची उरकली नाहीत म्हणून पुणे नगर हायवे सोडताना लागणाऱ्या बेलवंडी फाट्यावरच सिंगल बेल देत १५-२० मिनिटं प्रवाशांना उकडत ठेवलेलं आठवतं. त्यांना आव्हान द्यायला अजून भरात भर 'बेलवंडी फाट्यावरचं कोण कोण आहे त्यांनी खाली उतरून घ्या, पाठीमागे पारनेर गाडी लागलीय !' अशी घसाफोड करावी लागे. कॉलेजच्या मुलांची कमी नसल्याने अर्थातच मुलींकडे उद्देशून "म्याडम हे असं, म्याडम ते तसं" उगाच कलबला वाढवत पाणचट जोक केले जायचे. मुलांचे सगळे गुण या मिस कंडक्टर ला माहीत असल्याने त्यांच्या हा ला हा मिळवत त्यांना दुर्लक्ष करण्याचा हातखंडा बाळगून असे. पुरुष कंडक्टर पुढे मात्र या पोरांची "'तेरी भी चूप, मेरी भी चूप" होई. त्यात एवढ्या गर्दीत एखादी म्हातारी बाचकं (गाठोडं) घेऊन मिळेल तिथे बुड टेकून बसलेली दिसली की कंडक्टर लोकांचं डोकं फिरायचं. "म्हातारे, मरायची का एवढ्या गर्दीत ! आता हाफ तिकिटच बंद होणारंय मग नाही यायचे इकडं तुम्ही" घरीही सुनेचे टोमणे ऐकून घ्यायची सवय लावून घेतलेली म्हातारी त्यांचेही टोमणे ऐकून घेत थरथरल्या हाताने कमरेला खोसलेल्या बटव्यातून ओळखपत्र आणि गोल गुंडाळी केलेली धा ची नोट म्हातारी कंडक्टर च्या हातावर ठेवी. बऱ्याचदा आम्हा पासधारक विद्यार्थ्यांना सहानुभूती मिळायची, अनं "पास वाले पटकन आपापले ओळखपत्र आणि पास वरती काढून ठेवा !" हा गर्दीतला प्रपंच वाचायचा.


  • एसटी थांबत नाही, उपाय क्रमांक १


          झालं ! एकदाचं हे कंडक्टर प्रकरण मिटवलं की पुढची चिंता लागून राहायची आपल्या स्टॉप नसलेल्या फाट्यावर बेल देऊनही गाडी उभी राहील का ? शिरूर डेपो च्या एस टी गाड्या तिथे थांबत पण श्रीगोंदा वाल्यांनी तशी न थांबण्याची मानसिकताच बनवून घेतलेली होती. आम्हाला एकतर एक किलोमीटर अलीकडे राजापूर फाट्यावर किंवा मग थेट देवदैठण गावात उतरावं लागे. या सगळ्या प्रकारची प्रचंड चीड आणि कुणीच या प्रश्नावर विचार का नाही करत म्हणून खूप चिडचिड होत असे. १२ वी पर्यंत शांत, गरीब गाय असलेला मी, कंडक्टर आणि ड्रायव्हर शी हुज्जत घालण्यापर्यंतची चीड माझ्यात संचारली. अनेकदा त्यांच्याशी खटके उडू लागले. होणाऱ्या अन्यायावर बोलण्याचं हे धाडसही NSS मध्ये मिळालेल्या विचारसारणीतूनच आलं. तरीही परिस्थिती जैसे थे च राहिली !!   १२ वी नंतर सकाळी प्रॅक्टिकल असल्याने मी सायकल घेऊन थेट गावात सकाळी पावणे सहाच्या दरम्यान जाऊ लागलो. कसाबसा पावणे आठ ला कॉलेजात पोहोचणं व्हायचं. आधीच अभ्यासात रस आणि त्यात प्रवासाची ही रोजची कटकट असहनिय होती. बऱ्याचदा मी थेट एसटी च्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला तर समोरून उत्तर आलं "तुम्ही संबंधित डेपो मॅनेजर ला लेखी तक्रार दिलीय का ?" मग काय तिथेच आपली बोबडी वळली. एकदा रागाच्या भरात श्रीगोंदा डेपो मॅनेजर चा संपर्क मिळवला आणि थेट त्यांना परस्पर कॉल केला, त्यांनी माझी समजूत काढत लेखी तक्रार द्यायची गरज नाही मी सांगतो त्यांना असं कळवलं. त्यानंतर काही दिवस सुरळीत जातात न जातात परत एसटी खातं त्याच रुळावर आलं. यावेळी कॉल न करता मॅनेजर ला सविस्तर लेखी तक्रार केली तीही व्हाट्सएपच्या माध्यमातून ! काही फरक जाणवला नाही. बरेच दिवस असेच असह्यपणे गेले, यात अभ्यासाची परवड झाली, जास्त सेन्सिअर विद्यार्थी असूनही प्रत्येक लेक्चर करणं शक्य झालं नाही. 


  • सरकारी युक्ती, काट्यानेच काटा काढावा लागला ! 



       प्रत्येक गोष्टीला अंत असतो, आणि तो आपणच शोधायचा हे ठरवून या सगळ्या प्रकारावर एक शाश्वत उपाय करण्याची शक्कल डोक्यात आली. आमच्या फाट्यावरच विनंतीवरून बस थांबा केला तर ? पण त्याला गरज होती ग्रामपंचायतीचे अनेक दाखले, परवानग्या, आणि बरंच काही, ते कठीण होतं. एक पर्याय दिसला, आमच्या वाघमारे वस्ती फाट्यावर भव्य दिव्य समर्थ लॉन्स आणि त्यापलीकडे संस्कार पब्लिक स्कुल ही गावातीलच कौठाळे सरांची इंग्लिश मेडिअम शाळा. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांच्याकडेच ऑफिसमधील कामं करण्यासाठी जात असे, त्यामुळे सर्व शाळाच ओळखीची. कौठाळे सरांशी बोलून सरांच्या वतीने शाळेसाठी बस थांबा करण्याचा विनंती अर्ज लिहून दिला, त्यावर शाळेचा सही शिक्का पडला आणि पाठवून दिला आणि तो कामी आला ! थोड्याच अवधीत फाट्यापासून १० मीटरवर शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर "विनंतीवरून बस थांबा" ही पाटी उभी राहिली, आणि 'आता कंडक्टर, ड्रायवर ची बोलायची काय हिम्मत !' या अविर्भावात माझी कॉलर टाईट झाली. परंतु ११ वी ते प्रथम वर्ष अशी एस ती प्रवासाची तीन वर्षे इंग्रजांच्या पारतंत्र्यात अन्यायात गेल्यासारखी वाटली. वैयक्तिक स्वतंत्र झाल्याची फीलिंग एकच वर्ष घेता आली, पण आता एखाद्या म्हाताऱ्याला किंवा विद्यार्थ्याला उतरण्यासाठी फाट्यावर एसटी न थांबवता गावात नेऊन उतरवण्याची टाप कुना श्रीगोंदा डेपोतील कंडक्टर ड्रायव्हर जमातीची होत नाही याचं समाधान वाटतं. अशीच कॉलेजला जाताना होणारी प्रवासाची परवड अनेक गावांमध्ये आहे. यात चुका विद्यार्थी आणि प्रवाशांच्या की अति गर्दी सहन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या ? याचं विश्लेषण होऊन उपाय शोधनं गरजेचं आहे. परंतु जादा गाड्या सोडणे किंवा जास्त खेपा करणे हे आधीच दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या एसटी महामंळाला परवडणारे नाही हेही तितकंच खरं ! 


  • लाल परी, सर्वात भारी !



      बाकी विद्यार्थ्यांची समस्या वगळता एसटी ची सेवा परंपरा लेट का होईना पण वाड्यावस्त्यांना थेट जोडत आलेली ती तितकीच कौतुकास्पद आहे. अल्पदरात सुरक्षित प्रवास देणारी लाल परी मात्र दंगली आणि असंतोषीत नागरिकांची भक्षक होते, हे दुर्दैवी! खाल्ल्या ताटालाच लाथ मारण्याची प्रवृत्ती असलेल्या समाजाच्या गुटका, तंबाखूच्या पिचकाऱ्या झेलण्याचं दुर्दैव देखील सार्वजनिक मालमत्ता असणाऱ्या या परीचंच ! 




     गावात मुक्कामी थांबणाऱ्या एसटी बसशी आणि कर्मचाऱ्यांशी गावाचं एक स्नेहाचं नातं अजूनही पाहायला मिळतं. तर याच कर्मचाऱ्यांना गावागावात असणाऱ्या अनेक प्रस्थापित आणि गर्भश्रीमंत पुढाऱ्यांच्या जाचालाही सहन करावं लागतं. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या भत्ते आणि सरकारी योजनांमध्ये काही अपूर्णत्व आहे, ज्याचं कारण आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांनी केलेल्या मोठ्या संपात दिसून आलं. तर याच कर्मचाऱ्यांच्या जीवावर महाराष्ट्राला जोडणाऱ्या या महामंडळाने लाल रंगाची कात टाकत सुसज्ज आरामदायी बसच्या रुपात वाटचाल चालू ठेवलीय. जाता जाता एसटी महामंडळाला फुकटचा सल्ला देऊ इच्छितो तो वायफाय सेवेविषयी. 



     एसटी ने 'VOOT' ला दिलेलं WIFI कॉन्ट्रॅक्ट काढून घ्यावं, कारण त्याचा कसलाही फायदा प्रवाशांना होत नाही. त्या बदल्यात दुसरी काही सेवा दिली तर ती स्वागतार्ह असेल. येत्या काळात खेड्यापाड्यातील गोरगरिबांनाही परवडेल अशीच एसटीची डबल बेल वाजत राहावी ही अपेक्षा !

तुमच्या काय आठवणी आहेत एसटी सोबत ??
खाली कंमेन्ट भागात अवश्य सांगा, आणि आपलं नाव तिथे दिसत नसेल तर कंमेन्ट सोबत स्वतःचं नावही लिहायला विसरू नका. 

Comments

  1. Replies
    1. खूप खूप धन्यवाद नावकरी 😊

      Delete
  2. विनोदी शैलीत सुरूवात करुन वाचकांच्या कुतूहालापुढे नेमक्या प्रश्नांचा ऊहापोह करण्याची छान किमया साधली आहे.सुंदर👌
    रोजच्या अडचणीवर कायमस्वरुपी तोडगा काढला.त्याबद्दल तुझे खुप सारे कौतुक आणि अभिनंदन👏😊
    All the best👍
    Keep it up

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद कवयित्री प्राजक्ता 😊

      गंडलेल्या आयुष्याला विनोदी शैलीनं हाताळण हेच आपल्या हातात, आणि त्याशिवाय मजाही नाही 😁

      Delete
  3. Nice bhau
    सगळ तुझ नी लालपरीच नात सागितलस

    ReplyDelete
    Replies
    1. विशाल कनिच्छे

      Delete
    2. धन्यवाद विशाल दादा 😊

      Delete
  4. आमच्या वाघमारे परिवार मधील एक वैचारिक लेखक; तुषार वाघमारे.. लेख आवडला, आमचे कॉलेज चे दिवस आठवले, सेम अनुभव 2006 ते 2009. लालपरी (लैच भारी ते दिवस)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दादा 😊
      तुमच्या आठवणींचा हिस्सा बनल्याचा आनंद आहे. आणि माझं तुम्हाला कौतुक आहे याचाही अभिमान 😊

      Delete
  5. लेखात अगदी खरी परिस्थिती समोर मांडली आहे.....👌

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 😊

      Delete
  6. विनोदी शैली खूपच भावली ...
    एका दगडात अनेक पक्ष्यांचा जीव घेतलात...
    आजीबाईंची मात्र आवर्जून उपस्थिती आहे आ...
    माझ्या मते अजुनही गरीब गाय आहेस तू फक्त शिंगे फुटलेत 😜😜

    मेजवानी खूप आवडली .

    ReplyDelete
    Replies
    1. Atul sakunde

      Delete
    2. 🤣😂 होय गरीब गायचं आहे, परिस्थितीच्या शिकवणीची शिंगे फुटलीत.

      समर्पक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद नौसैनिक अतुल सर

      Delete
  7. Tu wi fi machini basvayla sangato ka kasa...... Ata mala kalal machins ka band zaly te😉😜

    ReplyDelete
  8. Kharach khup chan aahe .... mala amchya 12 vi chi aathavan zali .... Thanks

    ReplyDelete
  9. Kharach khup chan aahe .... mala amchya 12 vi chi aathavan zali .... Thanks

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

समीक्षा - साहित्य आणि साहित्य संशोधनाची सृजनशील वाट

'साहित्यसंशोधन - वाटा आणि वळणे'         पुस्तकाचे लेखक - डॉ. सुधाकर शेलार समीक्षावजा लेख - तुषार वाघमारे          सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत सामान्यांपासून ते तज्ज्ञांपर्यंत प्रत्येकातून नाराजीचाच सूर ऐकायला येतो. मग ते मूल्यशिक्षणाची तक्रार असेल किंवा मग जागतिक पातळीवर खरा उतरायला तितकासा सक्षम नसणारा भारतीय उच्चशिक्षित व्यक्ती ! 'भारताच्या IIT सारख्या संस्थेत शिकलेले विद्यार्थी पुढे अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये जाऊन जगाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य ठेवतात', असं आपण अभिमानाने मिरवत असतो, मात्र त्याच क्षणी PhD मिळवलेला विद्यार्थी भारतात 'सुशिक्षित बेरोजगार' म्हणून का फिरतो ? या प्रश्नाचं उत्तर अजूनही भारतीय शिक्षण व्यवस्थेला म्हणा किंवा इथल्या राजकीय नेतृत्वांना देता आलेलं नाहीय. यामध्येच मुद्दा येतो दर्जेदार शिक्षणाचा. शिक्षणाचा दर्जा हा सुद्धा प्रस्तुत प्रश्नाला बराचसा कारणीभूत ठरणारा मुद्दा आहे.           हे  सर्व चित्र पाहता डॉ. सुधाकर शेलार यांनी लिहिलेलं 'साहित्य संशोधन - व...

गाव माझा भाग - ३ लालटेन आणि चिमणी

        लालटेन आणि चिमणी             बऱ्याच दिवसांतून गावाकडच्या विसर पडलेल्या पण अजूनही आठवण काढली कि शेकडो गोष्टींची आठवण करून देणाऱ्या काही गोष्टींच्या या मालिकेत आज बऱ्याच दिवसांतून भेटत आहोत. तत्पूर्वी थेट चिंचदर्यात (देवदैठण गावाजवळची ब्राह्मणांच्या अवघ्या तीन चार घरांची वाडी) नेणाऱ्या, पानतासाने गुरं चारताना शुद्ध ब्राम्हणी भाषेत केलेली शिवार भेट आपण अजिंक्यच्या लेखांमधून अनुभवलीच !!       आमच्या वाघमारे वस्ती (देवदैठण आणि हिंगणीच्या शिवेवर वसलेली) वरती यायचं म्हटलं की प्रधानमंत्री योजनेतून झालेली डांबरी सडक तुम्हाला थेट वर्ग एक च्या वातानुकूलित डब्यात बसून गेल्याची अनुभूती देते. होय, नेमकं शहराचं वर्णन करताना गावाकडच्या उपमा द्याव्या लागतात तसं गावाची चुनुकही न अनुभवलेल्या उगवत्या पिढीला आधुनिक शहरी उपमा देनंही भागच. असो हा अनुभव मिळतो तो रस्त्याच्या दोन्ही अंगाला ऊस किंवा हिरव्यागार घासाच्या बागायत रानामुळे गुलाबी हवा म्हणता म्हणता चांगलीच कडकी भरंल अशी थंडी अनुभवायला देतो. वस्तीवरची मायेची ऊब अनुभ...

भयकथा १ - अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई...

अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई सत्य घटनेवर आधारित.. सायकलच्या पॅडलची करकर, मध्येच अंधारात न दिसलेल्या खड्ड्यात सायकल जाऊन वाजणारी घंटी आणि दोघांचीही चूप !  ना रस्त्याकडेला एखादं घर, ना शेतातली दिवाबत्ती, फक्त अंधार आणि अंधारच. अधुनमधुन एखादा माणूस गेल्यावर नातेवाईक जसा आक्रोश करतात तसा अक्राळविक्राळ आवाज काढणारे कोल्हे अंगावर शिरशिरी उठवत होते.           शिंदे (म्हणजे मी स्वतः), बंट्या तांबे (पोंचू) आणि माऊल्या दंडवते (कावळा). तिघांची गट्टी लंय झ्याक. गावात शाळेसमोरच आमचं जुनं घर उभ्या फळ्यांचं बनवलेलं. वर्गातून रस्त्यालगतची ती रूम खिडकीतून दिसेल अशी. इयत्ता १० वी चं वर्ष होतं, त्यामुळे STD मधून TD ने सायकल दामटत लवकर घरी जायचं, दिवस मावळायच्या आत घरचं असेल ते काम उरकून रूमवर हजर व्हायचं. हे नेमानं ठरलेलं. निमित्त अभ्यास असलं तरी, पोरं सोरं एकत्र आल्यावर खंडीभर उद्योग सुचतात.    असो त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत दुपारच्या सुट्टीत बेंच वर बुक्क्यांनी वाजवत चांगला ताल धरला होता. पोरींची रांग शेजारीच असल्याने सोज्वळ...