फोटो - अजिंक्य दंडवते |
कित्ती सारे आगळेवेगळे चेहरे पाहतोस दिवसभर,
आणि फक्त चेहरेच पाहतोस ?
नी त्यावरून स्वभावाचा अंदाज !!
कठीण आहे.
तो चेहरा तु पाहतोय तो नाहीय, काळा, गोरा किंवा सावळा
आणि का पाहतोय त्यांच्या चेहऱ्याकडे ?
ते तुझ्याकडे पाहतायत म्हणून ?
आणि ते पाहतायेत तुझ्याकडे, तु पाहत असशील म्हणून !
म्हणून तुझे खांदे ताठर आहेत आणि त्यांचेही.
त्यांनी ओळखलं नाहीय तुला, पाहिलंय !
त्यांना ओळख दे म्हणजे झालं, त्यांची ओळख पटेलच असं काही नाही.
नसेल ओळख पटत तर पटवून घे त्यांच्याकडून
तुझीही आणि त्यांचीही ओळख..
हरवतो तुही त्या आगळ्यावेगळ्या चेहऱ्यांमध्ये आजकाल
तु तिथे नाहीसच, आणि तेही नाहीत !
थोडा शोधून बघ स्वतःला, त्यांच्यातही आणि तुझ्यातही !!
~ तुषार वाघमारे, देवदैठण
९२७३१३००६३
खूप सुंदर लिहिले आहे सर.
ReplyDeleteधन्यवाद तेजल मॅडम 😊
Deleteखूप सुंदर लिहिले आहे सर.
ReplyDelete