काही कविता अशाच राहून जातात..
काही कविता तशाच कागदावर राहून जातात,
दोन पानांमध्ये
काही शब्द तसेच गोठून राहतात,
दोन ओळींच्या मध्ये..
काही भावना तशाच विरघळून जातात,
अपेक्षांच्या पाकांमध्ये..
काही संवेदना तशाच पडद्द्यासमोर राहतात,
पापणीचा केस बनून..
काही अश्रूही तसेच मिठागरासारखे,
वाळून जातात गालावर..
काही डोळे तसेच पाहात राहतात,
ध्येयाच्या उंचीकडे..
काही शब्द तसेच तरंगत असतात,
निःशब्द हृदयामध्ये..
काही कविता तशाच राहून जातात,
कागदाच्या घडीत..
संमेलनाच्या व्यासपीठावर..
फक्त जगायच्या राहून जातात !
- तुषार
९२७३१३००६३
काही माणसं अशीच राहतात मनात तुमच्यासारखी
ReplyDelete😊
Deleteखूप सुंदर
ReplyDeleteTysm तेजल 😊 भेट देत राहा..
Delete