कविता माझी, तुझ्याच साठी..
![]() |
फोटो - शुभम कांबळे |
अधुरे मन अधुराच मी,
अधुरी बनून पूर्ण मला तू करशील ना ?
मी झाड एकटे टेकडीवरती,
मखमली तो स्पर्श तू वारा बनून करशील ना ?
तहान लागता तुझ्या प्रीतीची,
बरसात प्रिये तू करशील का ?
सांज वेळी निवांत किनारी,
मंद झुळूक झेलताना उरी,
माझ्या अबोल चेहऱ्यावरती,
तुझी ओढणी मुद्दाम सोडशील का ?
तहान लागता तुझ्या प्रीतीची,
बरसात प्रिये तू करशील का ?
डाळिंब टच्च तुझ्या ओठांवरती,
उमटवत गीत माझे तुझ्या प्रीतीचे,
खांद्यावर माझ्या माथा टेकवत,
ते गीत माझ्यासाठी गाशील ना ?
फोटो - अविनाश जाधव
तहान लागता तुझ्या प्रीतीची,
बरसात प्रिये तू करशील का ?
केस सुगंधी सुमनांत तुझ्या त्या,
या भ्रमरास बंदिस्त तू करशील का ?
माथ्याला तो टेकून माथा
गोष्टी सुखाच्या करशील ना ?
तहान लागता तुझ्या प्रीतीची,
बरसात प्रिये तू करशील का ?
येऊ नये त्या दुःख समयी तू,
माझाच खांदा ओलावशील ना,
संकट समयी हातात हात
भरल्या नयनांनी माझ्याच नजरेत पाहशील ना !!
तहान लागता तुझ्या प्रीतीची,
बरसात प्रिये तू करशील का ?
- तुषार
Comments
Post a Comment