tusharpwaghmare.blogspot.com
मानवतेपासून दुरावलेली धर्माची व्याख्या..
छायाचित्र - जाधव अविनाश
एका संवेदनशील विषयाला हात घालतोय आजच्या परिस्थितीवर बोलण्यासाठी. सध्या माणुसकीच होत चाललेलं प्रदूषण याच एक कारffccण म्हणू शकता. प्रथमतः मी माझ्या अकालनाप्रमाणे धर्म या शब्दावर बोलेल, काय आहे धर्म ?? कुठून आली हि संकल्पना ?? आणि काय उद्देश होता या धर्म संकल्पनेचा ?? ऐकतो आपण धर्म म्हणजे काय तर विंचवाचा धर्म चावा घेणे, कुत्र्याचा धर्म रक्षण करणे (मानवाने दिलेलं विशेषण असेल तरी) किंवा चोरट्याचा धर्म चोरी करणे. परंतु इतकी साधी आणि सोपी व्याख्या आपल्याला पटत नाही किंवा ती आपल्या सुशिक्षित मेंदूला चिकटत नाही. आम्हाला धर्म हवा आहे अस्मितेसाठी !! याच निमित्ताने धर्माच्या खोलात जाऊ इच्छितो.
मानवजात अस्तित्वात आल्यानंतर तो पृथ्वीवर एकाच भौगोलिक ठिकाणी वास्तव्य करील हे शक्य नव्हतं. मग हा मानव आपल्या आपल्या प्रांतामध्ये प्रगत होत गेला, मग या प्रगतपणालाही प्रांतानुसार वेगळा वेग, वेगळी शैली आणि विचारसुद्धा वेगळेच. त्यात अरब प्रांतासारख्या वाळवंटातील मानव अंग झाकण्यासाठी जास्त उपलब्ध साधनांचा वापर करत गेला तर जिथे सूर्यप्रकाश कमी मिळतो अश्या अमेरिका खंडासारख्या शीत भागात लोक अंग झाकण्यासाठी कमी कपड्यांचा किंवा उपलब्ध साधनांचा वापर करणार. यानुसार पडत गेले मानवांचे समूह आणि प्रांताप्रांतामध्ये गट पडत गेले. सजीवांचा समूह आणि गट आला म्हणजे त्यांची स्वतःची अशी अलिखित, अघोषित अथवा घोषित संहिता, नियम आलेच. त्यांची ठराविक भाषा आणि वेशभूषा आली. हे सर्व ठिकाणानुसारचे भेद , विविधता नैसर्गिकरित्या जन्माला आली ती फक्त आणि फक्त जगणं सुकर करण्याच्या धडपडीतून. या शतकानुशतकांच्या प्रगतीच्या उलथापालथीमध्ये भाषा प्रगत झाली आणि विचारही प्रगत झाले. याच प्रदेशानुसार पडलेल्या गटांच्या नियमावली आणि संहितेला, जगण्याच्या साच्याला काळाने गोंडस आणि जोडशब्द असणार भारदस्त नाव दिलं *धर्म*!!!
या धर्माचा उद्देश काय तर फक्त आणि फक्त मानवी जीवन सुकर करणं. जस काळानुसार लोखंडाला गंज चढतो, तसाच प्रत्येक चांगल्या गोष्टीला कीड हि लागतेच लागते !! अगदी आपल्या महापुरुषांचंच उदाहरण घ्या ना, एवढी पराक्रमी कामं करून सुद्धा आज त्यांच्याच नावाने दंगली घडतायेत हा निसर्गाचा नियमच म्हणायचा नाही का ?? तसाच गंज चढत गेला या धर्म नावाच्या गोंडस नावाचा आपल्या गटाची आपल्या प्रांताची संस्कृती दुसऱ्या गटावर लादण्यासाठी होऊ लागली आक्रमणं परप्रांतांवर. मग हळूहळू राज्यराज्यांमध्ये आणि आता भारतात अगदी घराघरांमध्ये देखील या धर्माची लढाई. प्रत्येक धर्माची एक शिकवण असते हे जरी खरं असलं तर “सर्व धर्मांच्या शिकवणीचा आशय आणि उद्देश एकच असतो” हे साधारण तोंडपाठ वाक्य देखील खरंच बरं !! यावेळी नानांचा तो बोटे ठेचून रक्तात धर्म शोधायला सांगणार दृश्य डोळ्यासमोर येतं आणि ते फक्त अभिनयापुरतंच असतं हे tv चं चॅनेल बदलल्यावर समजतं, तेव्हा मन हतबल होतं आणि दुसऱ्यांची जगण्याचा संदेश देणारे सध्याचे कथाकथित धर्म स्वार्थी व्हा !! असा संदेश देताहेत कि काय असंच वाटतं. इति धर्माचा खेळ आत्तापर्यंत मांडला पण यात आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा आणि खास चर्चा (निष्कर्षशून्य) कुठल्या विषयावर करावी तर हा विषय घेऊ असा हा *देव* येतो कुठे ??
या माझ्या मतांशी आपल्याला जुळवून घेणं कठीण जाईल शक्यतो परंतु काही प्रश्न निर्माण होतील आपल्या धर्माच्या अस्मितेसाठी तर काही प्रश्न पडून ते सुटतील देखील. तर देव जाणायला सुद्धा आपल्याला मानवाच्या उत्क्रांतीपर्यंत जावंच लागेल. तर सुरुवातीला आपण मानव प्रजाती सर्वच श्रुष्टीला नवखे होतो. नंतर अग्नी या भलत्याच काहीश्या जादुबद्दल समजलं आणि नंतर त्याचं अस्तित्व आणि परिणाम समजायला लागले. सूर्य, अग्नी यांचं अस्तित्व आणि फायदे पाहता त्यांना पूजण्याची म्हणजेच त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रेखाटलेले , कोरलेले शिल्प आज आपल्याला संशोधनात मदत करतात. तर आधुनिक काळात दिसत नसलेल्याही गोष्टीचा शोध लागतो तो म्हणजे वरती फेकलेली प्रत्येक वस्तू खालच्या दिशेनेच खाली का येते ? याला *देव* घडवतो हे सर्व असं म्हटलं असतं तर ? काही हरकत नाही याला गुरुत्वाकर्षण ऐवजी देव म्हणून सुद्धा न्यूटन बाकी अनेक गोष्टींचा उलगडा करू शकला असता. थोडक्यात काय तर मानवाला उत्क्रांतीपासूनच बऱ्याच अद्भुत गोष्टींची अनुभूती आली, त्यांपैकी अनेक सकारात्मक बदल घडवणार्या होत्या. अज्ञात असलेल्या आणि अस्तित्वात उघड्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मानव नाव देऊ शकला नाही . या अद्भुत गोष्टीमुळेच माझ्या एखाद्या कृतीत अथवा जगण्यात सकारात्मक परिणाम होत असेल तर त्या गोष्टीसाठी निसर्गाकडे याचिका करणे , किंवा ती आशा बाळगणे हे मानवाला जाणवलं. आणि या अदृश्य शक्तींच्या (गुरुत्वाकर्षण त्याचाच भाग) एकत्रित पणाला त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो म्हणजे *देव* आहे ही एकत्रित संकल्पना बनली. आणि धर्माच्याच जोडीने प्रांरभेदानुसार, अंतरानुसार या देव संकल्पनेचेही उपभाग पडत गेले. आणि या संकल्पना उदयास येणं तितकच महत्वाचं होतं, त्या काळासाठी.
याच अद्भुत आणि गूढ गोष्टींना विज्ञानाने मात्र कारणासाहित अस्तित्व मान्य करून नावही दिलीत. मग त्यात गुरुत्वाकर्षण असेल, सुक्षजीव शास्त्रातील काही प्रक्रिया असतील, तर अंतराळात आकाशगंगांमध्ये होणारी अतिसूक्ष्म भौतिकी (Quantum Physics) असेल. जेव्हा मानव या गोष्टींना पारखा होता तेव्हा या गोष्टींना देव म्हणून या गोष्टी स्वीकारणं ठीक परंतु या युगात प्रत्येक गोष्टीमागच कारण मिळत असेल तर यामागे जादू वगैरे आहे हे मानणं या हे निसर्गविरोधी म्हटलं तरी चालेल. कारण थोड्याच दिवसात शिवायांसारख्या राजाला एवढे स्वराज्य निर्माण करणं शक्य झालं ते आधुनिक मानवासाठी मानसिकदृष्ट्या तरी अशक्य असेल, मग शिवाजी महाराजांकडे काहीतरी अद्भुत शक्ती होती या विचाराने आपण भविष्यात त्यांना देव म्हणून देव्हाऱ्यात स्थान मिळेल. मग हेच वेदकालीन ऋषी किंवा श्री कृष्णांच्या महाभारातकाळात जे घडलं ते दैवी शक्ती मूळे होतं असं आपण म्हणू शकत नाही. कारण हेच कि त्या काळात त्यांच्याकडे अवगत असलेली वेदकालीन साधना, योग आणि तत्वांच्या आधारावर घडलेल्या अनेक गोष्टी साकारण मान्य शक्य असाव्यात. काळाच्या ओघात त्यामध्ये काही कथा ओवल्याही जातात. उदाहरण द्यायचं झालं तर शिक्षणाचंच घ्या, ते ज्यांन आत्मसात केले, तो वकील, प्राध्यापक होतोय तर ज्याने नाही केलं तो चोर होतोय !! अगदी असच त्या काळी लोक जी खडतर साधना करत होते त्याला निसर्गाचीही जोड होती, ती आत्ता करणारा अस्तित्वात जरी असला तरी वातावरण ते नसल्यानं त्या काळी घडलेल्या गोष्टी शक्य नसतीलही !! धर्माच्या शिकवणी मानवी जीवन सुकर करण्यासाठी आणि ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्यांच्यासाठी धाक स्वरूपात अस्तित्वात येतात पाप पुण्य आणि स्वर्ग नरक पुनर्जन्म वगैरे वगैरे.. उद्देश एकच वाईट ते टाळा.
मग देव किंवा धर्म मानण्याचा शात्रीय आणि विधायक मुद्दा इथेच येतो की हे सर्व मान्य करत असताना मानव म्हणजेच आपण आणि सर्व सजीव सृष्टीला याचा फायदाच होतोय ना ?? कि परिणाम विनाष असणार आहे ?? कारण मला लहानपणी हा माझा धर्म किंवा देव आणि हा तुझा धर्म किंवा देव हे माहित नव्हतं. मला जरी एकाच धर्माची शिकवण असली तरी त्यातून मला समाजजीवन सुखी करणारेच संस्कार मिळाले होते, उध्वस्त करण्याचे नव्हे !! मला संस्कार मिळाले ते मानवी मनातील मद, मत्सर, दंभ, आणि अहंकार या माणुसकीच्या शत्रूंना नाकारण्याचे, तुझ्या कथित धर्मासाठी मानावतेविरोधात जा हे नव्हेत !! आणि हीच समाजजीवन आणि त्याअर्थाने स्वतःच जीवन सुकर करण्याची शिकवण प्रत्येक धर्म देतो. इतर धर्माचा अनादर करणे किंवा आपला धर्म श्रेष्ठ ठरवणे म्हणजे धर्म नव्हे. मानवाचा धर्म माणुसकीच असायला हवा. याच संस्कार करणाऱ्या शिक्षणाला अध्यात्म म्हटलं तरी चालेल. मग यात देव हा दुवा मध्ये आला नाही तरी चालेल.
म्हणून आता देव धर्म या संकल्पनांमध्ये गुरफटण्याचं सोडून लहानग्या निरागस चिमुरड्या मानवाच्या पिलांना जग सुखी करण्याचे संस्कार होणं गरजेचं, मग ते “अध्यात्म” कोणत्या जातीचं किंवा कोणत्या धर्मातून येतं हे बुद्दीजीवी प्राणी म्हणून प्रकर्षानं टाळायला हवं. साधं नातं जरी टिकवायच म्हंटल तर तिथे अहंकार बाजूला ठेऊन माघार घ्यावी लागते. आताही तेच अपेक्षित आहे. सकल मानवजातीन आपल्या जातीच्या लेबलखालील अहंकारी अस्मिता बाजूला सारून नीतीचा रस्ता पकडणे हि काळाची गरज आहे. यातून दोन गोष्टी सध्या होतील त्या म्हणजे मानव जीवणासाहित वसुंधरा सुखी होईल आणि दुसरी म्हणजे अंधश्रद्धा हा शब्द अस्तित्वात राहणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीला कारण आहे. त्या कारणाला विधायक उद्देश असावा एवढंच !!
~ तुषार वाघमारे , देवदैठण
९२७३१३००६३
tusharwaghmare441@gmail.com
आपण माझे इतर लेख वाचू शकता
tusharpwaghmare.blogspot.com वरती.
आपल्या प्रतिक्रिया आणि सुचनांचं स्वागत आहे !!
https://m.facebook.com/groups/223251224357967?view=permalink&id=2374013455948389&_rdr
#प्रासंगिक #जात_धर्म #अध्यात्म #मानवता #शिकवण #काळाचीगरज
👌👌
ReplyDeleteTysm Girish
DeleteKupach chaan ha bhava 👌👌
ReplyDeleteAsch likhan karit raha
Kupach bhari
धन्यवाद !! संकेत . असच प्रेम असुद्या.
DeleteKhup chhan....
ReplyDeleteधन्यवाद !! ब्लॉग ला भेट देत राहा. 😊
DeleteSuperb Bro
ReplyDeleteआभारी आहे !! असंच भेट देत राहा.
Delete#Nice bhava👌👌
ReplyDeleteधन्यवाद !! असच भेट देत राहा.
Delete