Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

प्रासंगिक - आपण कुठवर पोचलो ?

आपण कुठवर पोचलो ?        पृथ्वीवर आपण किती छोटे आहोत यापेक्षा या ब्रह्मांडात आपण इवलेसे जीव सुद्धा नाहीत हे सत्य आहे. इतर प्राण्यांप्रमाणेच माणूस, फक्त त्याला बुद्धि जास्त.         त्याने हे सगळं तयार केलं या बुद्धीच्या जोरावर. बुद्धी सोडून सगळ्या माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये काही फरक नाही. खाणे, पिणे, पचवणे, संभोग, मुलांना जन्म देणे, म्हातारे होणे आणि मरून जाणे. प्रत्येक प्राण्याला या सर्व गोष्टी आणि सोबत भावनाही असतात. आपले जोडीदार सुद्धा ! तसे माणसांनाही आहेत. फरक इतकाच, त्याने या नात्यांना नावं दिली, आणि कोणत्या नात्यातल्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केलं पाहिजे हे मापदंड ठरत गेले. त्यानुसार कोणतं वागणं नैतिक आणि कोणतं अनैतिक याच्या व्याख्या बनत गेल्या आणि हे नात्याचं प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनत गेलं.          पक्षी, प्राण्यांची आई पिलाला जन्म देते. त्याच्या पंखात, पायात बळ येईपर्यंत, त्याला स्वतःची अन्नाची गरज भागवता येईल, इथपर्यंत ते आपल्या जीवनाचा कितीतरी भाग खर्च करत असावेत. नंतर ते त्याला सोडून दिल्य...