भिताड आणि आरण दगडाची भिंत (भिताड) आरण परिस्थिती जगायला शिकवते या एका सुंदर आणि नैसर्गिक वाक्याप्रमाणे मी घडत आलो. अशाच परिस्थितीकडून शिकण्याच्या वर्गात अर्थात माझे वडीलही बसले. या वर्गात शिकताना त्यांच्याकडे विविध अनेक कला अंगीकृत आहेत. कला म्हटलं की ती कला माणसाला आर्थिकदृष्ट्या सबल बनवीलच असं काही नाही परंतु एक व्यक्तिमत्वासहीत समाजातलं विशेष स्थान आणि पोट भरण्यापुरतं सामर्थ्य कलाच देते. असो. अशीच एक जुन्या लोकांची कला म्हणजे दगड किंवा घडवलेल्या तोडींची भिंत रचण्याची कला. प्रश्न पडणं सहाजिक आहे, गवंडी का नाही म्हटलं ? गवंडी ही आपण व्यावसायिक संकल्पना म्हणू शकतो ,ज्यामधे तो विविध उपकरणे, साहित्य वापरतो. इकडे दगडांपासून भिंत रचणे म्हणजे कसलंही साधन नाही. फक्त बलशाली हात आणि दगड पुरेसे. पूर्वी घर खणाचं (मोठमोठ्या लाकडांचं छत) असो किंवा छप्पराचं, दोन्हींकडे दगडाच्या भिंती बांधल्या जायच्या. त्यावर पांढर्या मातीने लिंपून सारवणं व्हायचं.आईने आतू...
"अगणित शब्दांच्या विश्वात तरळताना विचारांचा एक सात्विक थर तयार व्हावा, जो घेऊन जातो मनाला एका विचारश्रेणीवर, तरळत राहावा हा थर मनात आणि मज्जारज्जूतून थेट मस्तकात जात मेंदूकडून उतरावा अवयवांच्या तेजस्वी रूधिरामध्ये, जो घडवील एक क्रांतीकारी कार्य जे या कलमातून शब्दातआणि शब्दातून विचारसंकल्पात दृढपणे रूतून बसेल..."