Skip to main content

Posts

Showing posts from February, 2018

विज्ञान साहित्य - १ इस्रोचा ब्रह्मांडविस्तार

             ..इस्रोचा ब्रम्हांडविस्तार..        २० आणि २१ व्या शतकात भारताने जगाबरोबर विशेष वैज्ञानिक प्रगतीचा वेग साधला. याच काळात आपल्या सजीवपणाच्या असण्यापलीकडच्या कितीतरी विशाल अज्ञात गोष्टी विज्ञानयुगात माणसाला ज्ञात झाल्या. आपल्या अस्तित्वाबद्दलचे अनेक गुढ उकलणे विज्ञानाने शक्य झाले.या गोष्टी जरी कल्पनाविवश होऊन समजून घ्यावा लागत असल्या तरी भारतीय इतिहासाला या गोष्टी नवीन नाहीत.खूप वर्षांपूर्वी ऋषि, वेद ,पुराणांमधे या काल्पनिक ब्रम्हांडांचा उल्लेख आढळतो. फरक इतकाच की ते फक्त लेखन आणि कल्पनेपर्यंतच मर्यादित राहिलं विज्ञानयुगात मनुष्य सदेह अनुभवतोय अवकाशात प्रत्यक्ष झेप घेऊन ! डार्विनच्या सिद्धांतानुसार सजीवांना जगण्यासाठी स्वत:ला काळानुरूप बदलून अस्तित्व टिकवावं लागतं. मग जेव्हा स्टीफन हॉकिंगसारखे तत्वद्वेत्ते १०० वर्षात माणसाला पृथ्वी सोडावी लागण्याची धास्ती घालतात, ती काही कुणा नेत्याच्या आश्वासनासम नव्हे ! तर जगाचं पाऊलच सध्या त्याच दिशेने वेगाने पडतंय. अशा भयाण भवितव्याला तोंड देण्यासाठी विज्ञान आणि संशोधन हेच अस्र वापरा...