#सोन्यालावाचावा - प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या जसजसा दसरा जवळ येतोय, #सोन्यालावाचवा या मोहिमेला महाराष्ट्रभरातून चांगलाच प्रतिसाद लाभतोय. राष्ट्रीय सेवा योजने मधून प्रेरित तुषार दत्तात्रय ढोले या पर्यावरणप्रेमी तरुणाने यावर त्याचे अविस्मरणीय अनुभव आपल्याशी वाटून घेतलेत. अकोल्याचा तुषार एक NEIDA Green NGO नावाच्या स्वयंसेवी संस्थेचा स्वयंसेवक आहे, त्याचबरोबर ग्रीन आर्मी महाफॉरेस्ट आणि Helping Hands या स्वयंसेवी संस्थांचाही तो स्वयंसेवक आहे. तुषार दत्तात्रय ढोले, पिंपळगाव निपाणी, ता. अकोले जि अहमदनगर “भारतीय संस्कृती महान आहे त्याचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. आपटा संस्कृतमध्ये अश्मन्तक तर बोलीभाषेत सोन, शिलांगण. बोडक्या डोंगरावर वनीकरणासाठी एक आदर्श झाड, दसऱ्याचं आणि आयुर्वेदिक मुतखडा होऊ नये देणारे/जिरवणारे याची पाने, शेंगांच्या बिया, फुले, झाडाची साल औषध म्हणून वापरतात. सालीपासून दोरखंड बनवतात, झाडांपासून डिंक मिळतो, यापासून आणि टॅनिनही मिळते. आणि पान बिडी बनवण्यासाठी वापरली जातात....
"अगणित शब्दांच्या विश्वात तरळताना विचारांचा एक सात्विक थर तयार व्हावा, जो घेऊन जातो मनाला एका विचारश्रेणीवर, तरळत राहावा हा थर मनात आणि मज्जारज्जूतून थेट मस्तकात जात मेंदूकडून उतरावा अवयवांच्या तेजस्वी रूधिरामध्ये, जो घडवील एक क्रांतीकारी कार्य जे या कलमातून शब्दातआणि शब्दातून विचारसंकल्पात दृढपणे रूतून बसेल..."